गावठी कट्ट्यासह एकजण अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

औरंगाबाद - गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे विक्रीसाठी आणलेल्या संशयिताला गुन्हे शाखेने गुरुवारी (ता. 29) अटक केली. त्याच्याकडून कट्ट्यासह काडतुसे पोलिसांनी जप्त केली. 

औरंगाबाद - गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे विक्रीसाठी आणलेल्या संशयिताला गुन्हे शाखेने गुरुवारी (ता. 29) अटक केली. त्याच्याकडून कट्ट्यासह काडतुसे पोलिसांनी जप्त केली. 

राजसिंग ऊर्फ कुलदीपसिंग शामसिंग कलानी (वय 24, रा. टीव्ही सेंटर, म्हाडा कॉलनी, जालना) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. तो रेल्वेस्थानक परिसरातील एमआयडीसीत येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यांनी येथील शहासुक्त दर्ग्याजवळ सापळा रचला. त्यानंतर घेराओ घालून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून झडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी कट्टा, काडतुसे सापडली. हे साहित्य व त्याची दुचाकी पोलिसांनी जप्त केली. त्याच्याविरुद्ध उस्मानपुरा पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली. दरम्यान त्याला अटक केली असता, कट्टा व काडतुसे विक्रीसाठी आणल्याची कबुली त्याने दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याला उस्मानपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

Web Title: one arrested in aurangabad