खुनातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या ; चौथ्या खुनाच्या घटनेचा उलगडा

खुनातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या ; चौथ्या खुनाच्या घटनेचा उलगडा

नांदेड : अतिशय किचकट व कुठलाही पुरावा नसताना अत्यंत शिस्तबध्द सापळा लावून जिल्ह्यातील तीन खुनाचा उलगडा करून मारेकऱ्यांना स्शानिक गुन्हे शाखेचे सहाय्‍यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकांनी तुरुंगात टाकले. त्यानंतर शुक्रवारी (ता. १०) रात्री पुन्हा एका चौथ्या खुनाचा तपास करत मारेकऱ्याला अटक केली. हा चौथा गुन्हा उघडकीस आणल्याने अनेक गुन्हेगारांत धडकी भरली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, विमानतळ आणि मुदखेड ठाण्याच्या हद्दीत तीन युवकांचे अपहरण करून निर्घृण खून करून मारेकरी मोकाट होते. या मारेकऱ्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. परंतु पोलिस अधीक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या योग्य तपासाच्या दिशेमुळे तीन खुनाचे गुन्हे उघडकीस आले. त्यासाठी विनोद दिघोरे यांच्या पथकांनी महत्वाची भूमिका बजावली. या प्रकरणातील मारेकरी कारागृहात सध्या हवा खात असतांना शुक्रवारी (ता. १०) रात्री वाजेगाव भागातून नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत गोविंद काळे रा. जुना कौठा, नांदेड याचा रस्त्यावरील टेम्पोला धडक बसून 17 मे, 2018 रोजी मृत्यू झाला होता. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल होता.

टेम्पोचालक काजी अकबर काजी बाबर (वय २२) या चालकाने तुप्पा शिवारात आपला टेम्पो (एमएच२६-४३१९) निष्काळजीपणे रस्त्यात उभा केला होता. मयत काळे याची दुचाकी पाठीमागून धडकली. यात त्याचा जागीच गळा चिरून मृत्यू झाला होता. आरोपी अकबर काजी याच्याकडून दुचाकी ( एमएच२६-बी-४३१९) जप्त केली.

अपघातात ठार झालेल्या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल होणे. ही जिल्ह्यातील पहिली घटना असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईत फौजदार सदानंद वाघमारे, कल्याण नेहरकर, जसवंतसिग साहू, जांभळीकर, राजू पागंरीकर, बालाजी सातपुते, तानाजी येळगे, जावेद, परदेशी, टाक आणि श्रीरामे यांनी परिश्रम घेतले. आरोपी अकबर काजी याला नांदेड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com