नांदेडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

सदर युवतीचा विरोध असताना तिच्यावर गणेश विसर्जनाच्या दिवशी आपल्या घरी कामानिमित्त बोलावून तिच्यावर अत्याचार केला. परंतु ही बाब सदर युवतीने भीतीपोटी आपल्या घरी सांगितली नाही.

नांदेड : एका अल्पवयीन युवतीसोबत प्रेमसंबंध जुळवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या युवकावर लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोहा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन युवतीस त्याच गावातील युवक नाथराव उत्तम केंद्रे याने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. सदर युवतीचा विरोध असताना तिच्यावर गणेश विसर्जनाच्या दिवशी आपल्या घरी कामानिमित्त बोलावून तिच्यावर अत्याचार केला. परंतु ही बाब सदर युवतीने भीतीपोटी आपल्या घरी सांगितली नाही.

दरम्यानच्या काळात या प्रकरणाला वाचा फुटली. पीडित मुलीला घेऊन नातेवाईक लोहा पोलिस ठाण्यात हजर झाले. तिच्या फिर्यादीवरून नाथराव केंद्रे याच्यावर अत्याचार, अनुसूचित जाती प्रतिबंधक अत्याचार व बाल लैंगिक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक काथवटे हे करीत आहेत.

Web Title: one charged for sexual harassment of minor girl