नांदेडमध्ये एक कोटीचा रेशनचा धान्यसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

नांदेड - काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने साठा करून ठेवलेला शासकीय वितरणातील (रेशन) सुमारे एक कोटीचा गहू, तांदूळ जप्त करण्यात आला. कृष्णूर (ता. नायगाव) येथील इंडिया मेगा ऍग्रो एजन्सी येथे बुधवारी (ता. 18) रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांचे विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दहा ट्रकही जप्त केले आहेत. सर्व ट्रकचालकांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी इंडिया मेगा ऍग्रो एजन्सी कंपनीचे मालक अजय बाहेती, व्यवस्थापक प्रकाश तापडिया, ट्रकचालक, फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाचे (एफसीआय) पुरवठादार, मालवाहतूकदारांवर कुंटूर पोलिस ठाण्यात शासनाची फसवणूक, जीवनावश्‍यक वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी दिली.

Web Title: one crore ration grains seized crime

टॅग्स