'अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग'

umar habib
umar habib

पूर्णा (परभणी): अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग या मंगळवारी (ता. 19) आयोजित उपक्रमात आपाआपल्या ठिकाणाहून सहभागी व्हा, असे आवाहन प्रसिद्ध विचारवंत व किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केले आहे.

राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणजे साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबियांच्या सामूहिक आत्महत्या. त्यांचा स्मृती-दिन 19 मार्च असून या घटनेला 33 वर्षे झाली. पण शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र काही केल्या आजही थांबत नाही. सरकारने आपली धोरणे राबविण्यासाठी कायदे केले. सरकारे बदलली पण कायदे बदलले गेले नाहीत. शेतकरी गुलाम आहेत म्हणून त्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. खरे तर या आत्महत्या नसून सरकारने पाडलेले खून आहेत. असा आरोप 'सकाळ'शी बोलताना प्रसिद्ध विचारवंत व शेतकऱ्यांच्यासाठीच्या चळवळीत काम करणारे अमर हबीब यांनी केला.

शेतकऱ्याना स्वातंत्र्य द्यायला कोणी तयार नाही. जो तो आपल्या मस्तीत दंग आहे. अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो? आपल्या हातात सत्ता नाही, आपल्या हातात शस्त्र नाही. आपण सामान्य माणसे आहोत. सामान्य माणूस काय करू शकतो? विचार करा, जर आपल्या घरात अशी घटना घडली तर...आपल्याला त्या दिवशी घास जाणार नाही. बस तसेच समजा अन मंगळवारी (ता. 19) आत्महत्या केलेल्या सर्व शेतकऱ्याना स्मरून शेतकरी स्वातंत्र्यासाठी एक दिवस अन्नदात्यासाठी अन्नत्याग करा, अशी भावनिक साद अमर हबीब यांनी घातली असून या आपल्या भावनेचा, कृतीचा आणि संकल्पाचा दूरगामी परिणाम झाल्या शिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संपूर्ण महाराष्ट्रातून या उपक्रमास उस्फूर्त पाठिंबा मिळत असून, एकूणच शेतकऱ्यांचे ऋण मानणारा आपला देश असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

अमर हबीब यांनी पहिल्या वर्षी साहेबराव करपे यांचे गाव चिल गव्हाण येथे उपवास सुरू केला होता. दुसऱ्या वर्षी त्यांनी जेथे आत्महत्या केली त्या दत्तपुरला भेट देऊन पवनार येथे उपोषण केले होते. या वर्षी ते व अनंतराव देशपांडे दिल्लीत महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी  (राजघाट) परिसरात राहून वैयक्तिक उपवास करणार आहेत. 19 मार्चच्या उपोषण / उपवास / अन्नत्याग आंदोलनात तुम्ही प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे त्यांनी कळकळीचे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com