हिंगोली: जीप टेम्पोवर आदळून एक ठार, नऊ जखमी 

मंगेश शेवाळकर
बुधवार, 28 मार्च 2018

गोदावरी पुंजाराम मुळे (वय ६०, रा.वाघळा ता, मंठा) यांचा मृत्यू झाला. तर इतर नऊ जण जखमी झाले आहेत.

हिंगोली : औंढा नागनाथ ते वसमत मार्गावर भेंडेगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ टेम्पो चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागील जीप (एमएच 38 व्ही 159) टेम्पोवर आदळून अपघात झाला. यामध्ये गोदावरी पुंजाराम मुळे (वय ६०, रा.वाघळा ता, मंठा) यांचा मृत्यू झाला. तर इतर नऊ जण जखमी झाले आहेत.

मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता ही घटना घडली आहे. कुरुंदा पोलिसांनी जखमींना उपचारासाठी वासमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. सर्व जण वाघळा येथून बारड मार्गे चंद्रपूर येथे जात होते.

Web Title: one dead in accident hingoli