मेथीची भाजी खाल्ल्याने एकाचा मृत्यू; चार गंभीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

उमरी(नांदेड)- मेथीची भाजी खाल्याने एकाच कुटुंबातील पाच जणाला विष बाधा झाली. यामध्ये एकाचा मुत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. विषबाधा झाल्यानंतर त्यांना उमरी येथिल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु प्राथमिक उपचार करुन त्यांना नांदेड येथिल रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.

सदर घटना ही नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील कळगाव येथिल आहे. ही घटना काल गुरुवार (ता.20) रोजी रात्रीच्या वेळी घडली आहे. यामध्ये कोंडिबा गंगाराम कदम वय 65 वर्षे यांचा मृत्यू झाला. तर आनंदा कोंडिबा कदम, कल्पना आनंदा कदम, पद्मीनबाई मारोती कदम, श्लोक शिवाजी कदम, आदी कुंटुबातील व्यक्ती गंभीर आहेत. जखमीवर नांदेड येथिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस ही विषबाधा नेमकी कुठल्या कारणाने झाली असेल याचा शोध घेत आहेत.

Web Title: One Die Due to eat leafy vegetables Four serious