बोलेरो - रिक्षाच्या अपघातात एक ठार

नवनाथ इधाटे
मंगळवार, 26 जून 2018

फुलंब्री (औरंगाबाद) : फुलंब्री - सिल्लोड रस्त्यावरील पाथ्री गावाच्या परिसरात बोलेरो गाडी व लोडींग अपे रिक्षाचा समोरसासमोर झालेल्या अपघातात एक ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता.25) रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली. नबील कुरेशी वय 25 रा.कटकट गेट असे अपघात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. वडोद बाजार पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

याबाबत अधिक माहिती अशी की, येसगावकडून  फुलंब्री मार्गे खामगाव येथे बोलरे एम.एच.20, ए. जी.4113 जात असतांना पाथ्री गावाच्या परिसरात समोरून येणारे लोडींग अपे रिक्षा क्रमांक एम.एच.20,  डी. ई. 1101 या दोन्ही गाड्यांचा सोमवारी (ता.25) रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास समोरासमोर अपघात झाल्याने एक जण ठार, तर नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात नबील कुरेशी वय 25 रा.कटकट गेट हे जागीच ठार झाले आहे. तर शेख अतिक (फोमवाडी), मंदा अशोक खंडागळे, संगीता खंडागळे, जिजाबाई खंडागळे, चंद्रकला खंडागळे, शकुंतला खंडागळे, रेखा खंडागळे, विठ्ठल खंडागळे, गणेश खंडागळे हे सर्वजण (रा.येसगाव) गंभीर जखमी झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच चालक विजय देवमाळी यांनी आपल्या दोन रुगवाहिकेतून सुरवातीला फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर प्रथोमपचार करण्यात आला. त्यानंतर उर्वरित जखमींना औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: one dies in accident of bolero and auto