बीड जिल्ह्यात दिवसाआड एका शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

बीड - शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले असले, तरीही यात अनेक त्रुटी असल्याने बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. त्यामुळेच कर्जमाफीनंतरही जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. जानेवारीपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ९० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे प्रशासनाने घेतलेल्या नोंदींवरून दिसते. जिल्ह्यात कर्जमाफीनंतरही दिवसाआड एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे आकडे बोलतात. गेवराई तालुक्‍यात सर्वाधिक १६ आत्महत्या झाल्या असून, या खालोखाल बीड तालुक्‍यात १५ व केज तालुक्‍यात १० आत्महत्या झाल्या आहेत.

Web Title: One farmer suicides in Beed district