शंभर रुपयांच्या पुरेशा नोटा बाजारात येईनात! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - आतापर्यंत हजार, पाचशे रुपयांच्या नोटांची साठेबाजी करून काळा पैसा बाजारात अनेकदा चलनात आणला जात होता. आता हजार, पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर तासान्‌तास रांगे उभे राहून मोठ्या कष्टाने अनेकांनी बॅंकेतून शंभर रुपयांच्या नोटा मिळविल्या. आणखी शंभर रुपयांच्या नोटा कधी मिळतील याची धास्ती असल्याने बहुतांश जणांनी काटकसरीने खर्च करीत शंभर रुपयांच्या नोटा आपल्याच जवळ ठेवल्या आहेत. त्यामुळे बाजार, व्यवहारात अद्यापही शंभर रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवत आहे. 

बहुतांश जणांनी घरातील जेवढ्या सदस्यांचे खाते आहे त्यांच्या खात्यातून शंभर रुपयांच्या नोटा काढून आपल्याजवळ ठेवल्या आहेत. त्यामुळे बाजारात शंभर रुपयांच्या नोटांची चणचण जाणवताना दिसते. बॅंकांना आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या शंभराच्या नोटांचे चलन खातेधारकांना दिले आहे. तरीही बाजारात अनेक ठिकाणी अद्यापही चलन तुटवडा कायम दिसतो. अनेक बॅंकांकडे तर शंभर रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवल्याने त्यांनी दोन हजारांच्या नोटा दिल्या आहेत. बॅंकांकडून कोट्यवधी रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा देण्यात आलेल्या असल्या तरी बाजारात कुठेही त्या व्यवहारात दिसत नाहीत. चलन तुटवड्याने बहुतांशजण दोन हजारांच्या नोटांचे सुट्टे पैसे देण्यास तयार नाहीत. 
 
दैनंदिन गरजांची खरेदीसाठी दहा, पन्नासच्या नोटांचा वापर 
इतके दिवस शंभर रुपयांच्या नोटा बाजारात अतिशय कमी प्रमाणातच होत्या. आता अनेकजण किराणा सामान, दूध, भाजी अशा दैनंदिन गरजेच्या खरेदीसाठी दहा, वीस, पन्नासच्या नोटांचा वापर करीत आहेत. तरीही या नोटांचा तुटवडा दिसून येतो.

Web Title: One hundred rupees notes shortage