औरंगाबाद ः भिंत काेसळून एक जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

घोसला (ता. सोयगाव) येथे रविवारी रात्री अचानक घरासह गोठा कोसळल्याची घटना घडली. दरम्यान, घराची व गाेठ्याची भिंत कोसळून घरातील मुलगा आणि गोठ्यातील जनावरे जखमी झाल्याची घटना घडली.

सोयगाव  : संततधार पावसामुळे घोसला (औरंगाबाद) येथे रविवारी रात्री अचानक घरासह गोठा कोसळल्याची घटना घडली. दरम्यान, घराची व गाेठ्याची भिंत कोसळून घरातील मुलगा आणि गोठ्यातील जनावरे जखमी झाल्याची घटना घडली.

दरम्यान, जखमी बालकाला जळगावच्या रुग्णालयात तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घोसला येथील रणजीत सखाराम उगले हे आपल्या कुटुंबांसोबत घरात झोपले असताना, अचानक त्यांना घराच्या भिंत कोसळण्याचा आवाज आला, त्यांनी झोपेत असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु यामध्ये घरातील कांतीलाल रणजीत उगले हा घरातच अडकल्याने त्याच्या अंगावर घराची भिंत कोसळली. यामध्ये कांतीलाल गंभीर जखमी झाला आहे. तसेच घराच्या बाजूचा गोठाही कोसळल्याने गोठ्यातील गाईंसह तीन जनावरे गंभीर जखमी झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one injured in wall collapsed in Aurangabad