जालना : मध्यप्रदेशातील मजुरांच्या वाहनाचा अपघात, एक ठार, 24 जखमी

दिलीप पवार
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

  • अपघातग्रस्त मध्यप्रदेशातील 
  • जात होते गेवराईकडे
  • दोघांची प्रकृती चिंताजनक

अंकुशनगर (जि.जालना) - औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील दोदडगाव फाट्याजवळ आज (शुक्रवारी) पहाटे एका पिकअपच्या चालकाला डुकली लागली. त्यामुळे पिकअपने तब्बल तीन पलट्या खात मार्गाच्या खड्ड्यात पलटी झाले. यात एक जण ठार तर 24 जण जखमी झाले आहे.  दिनेश छतरसिंग सोलंकी (वय 26, रा. शिरवेल ता.शेंडवा जि.बडवानी, मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे. 

मध्यप्रदेश येथून गेवराईकडे एक पिकअप (क्र. एमपी 10, जी 1182)  गेवराई येथील बाहुबली जिनिंग येथे कामासाठी 30 मजूर घेऊन निघाले होते. मात्र, औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील दोदडगाव फाट्याजवळ पिकअप चालकाला डुकली लागल्याने ते पलटी झाल्याने त्याने तब्बल तीन पलट्या खात ते रस्त्याच्या बाजूला असलेल्या साइड पंख्याच्या खड्ड्यात जाऊन आदळले. या भीषण अपघातात 24 जण जखमी झाले असून, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला.

सहा महिन्यानंतर 'पुन्हा येईन' : देवेंद्र फडणवीस

जखमीपैंकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे जमजते. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रुग्णवाहिका व पेट्रोलिंग व्हॅन घटनास्थळी दखल झाली. जखमींवर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. दिनेश छतरसिंग सोलंकी (वय 26, रा. शिरवेल ता.शेंडवा जि.बडवानी, मध्यप्रदेश) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पप्पू रमेश चव्हाण (वय 20), तुकाराम ब्राह्मणे (वय 12 दोघे रा.आमसरी ता.भगवानपुरा, जि.खरगोन), बिला गणेश जमरे (वय 18), संगीता भुवरे (वय 18), शीतल यादव (वय 22), वर्षा सोलंकी (वय 20), मंजू कांतीलाल दुवे (वय 20),  गणेश काकडी जमरे (वय 21) संगीता सोलंकी (वय 15), रेवती हिरालाल सोलंकी (वय 24),घोडेलाल जलसिंग भुवरे (वय 24 सर्व रा.शिरवेल ता.शेंडवा जि.बडवानी मध्यप्रदेश) आदींचा जखमींमध्ये समवेश आहे. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

Image may contain: one or more people, tree, outdoor and nature
अपघातग्रस्त वाहन

यांनी केली मदत

या सर्वांना महामार्गावरील रुग्णवाहिकेद्वारे पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सर्वांवर वैद्यकीय अधिकारी डॉ. इफ्फत हाश्मी , डॉ.राहुल दवणे आदींनी प्रथमोपचार करून त्यांना औरंगाबादला उपचारासाठी पाठविले.

'मी पुन्हा येईन, पुन्हा येईन' असे म्हणणार नाही, पण... : संजय राऊत

स्लॅब कोसळल्याने चार मजुर जखमी
गल्लेबोरगाव (जि.औरंगाबाद) - शिवना-टाकळी (ता. कन्नड) येथे शिवना नदीवर सुरु असलेल्या पुलाच्या कामाचा गुरुवारी (ता.14) सकाळी स्लॅब कोसळल्याने कामावरील चार मजुर जखमी झाले. जखमी मजुरांना प्रथम गल्लेबोरगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल केले.

यावेळी डॉक्‍टरांनी तीन मजुरांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले. पुलाच्या बांधकामावर अभियंत्यांचे दुर्लक्ष व कंत्राटदाराचा हलगर्जीपणा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Killed, 24 Injured in Accident at Dodegaon dist Jalana