पैठण लिंक रोडवर अपघातात एक ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : पैठण लिंक रोडवर ट्रकने शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. शेख अब्दुल हमीद शेख गुलाम कादरी (वय 35, रा. ढोरेगाव ता गंगापूर) असे मृयचे नाव आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख अब्दुल हमीद हे हायवा ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम करतात. शनिवारी सकाळी सात वाजता दुचाकीने (एम एच 20 ए डी 1726) झालटा येथे जात होते. एस क्लब येथून पैठण लीक रोडवरून थोड्या अंतरावर त्यांना ट्रकने पाठीमागून धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले. वाळूज एमआयडीसीचे पोलिस सिद्धीकी यांनी त्यांना घाटीत दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. आठवड्यातील ही तिसरी घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

Web Title: One killed in accident on Paithan link road