दुचाकी दुभाजकाला धडकून एक ठार, एक गंभीर जखमी     

One killed and one serious injured in two wheelers Accident
One killed and one serious injured in two wheelers Accident

आडुळ : दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एक ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना औरंगाबाद - जालना रस्त्यावरील चिकलठाणा (ता. औरंगाबाद) येथील बाजारतळासमोर रविवारी (ता. 3) सकाळी आठच्या सुमारास घडली. 

मोहसीन युसूफ अत्तार (वय  25 रा. आडुळ बु. ता. पैठण जि. औरंगाबाद) व साहिल सुभान आत्तार (वय 15, रा. हिनानगर, चिकलठाणा, औरंगाबाद) हे दुचाकीने (एमएच 25 जीव्ही 7904) चिकलठाण्याकडे येत होते. त्यावेळी त्यांची दुचाकी अचानक दुभाजकाला धडकली. यात मोहसीन जागीच ठार झाला तर साहील हा गंभीर जखमी झाला. या अपघाताची नोंद चिकलठाणा एमआयडीसी पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com