कायगाव : कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार    

जमील पठाण
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

अंमळनेर वस्ती (ता. गंगापूर) येथील शेतकरी वसंत गोविंद मिसाळ (वय 55) हे स्कुटीवरून (एमएच. 20 ईएम. 6889) नवीन कायगाव येथे दूध डेअरीला घेऊन जात असताना औरंगाबाद-नगर महामार्गावर नवीन कायगावच्या दिशेने वळण घेत असतांना नगर कडून भरधाव वेगात आलेल्या कारने (एमएच 20 डीपी 8811) जोराची धडक दिली.

कायगाव : औरंगाबाद-नगर राष्ट्रीय महामार्गावर अंमळनेर (ता. गंगापूर) शिवारातील लखन हॉटेलजवळ रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस भरधाव वेगात नगरकडून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 21) सकाळी सात ते साडेच्या सुमारास घडली. अंमळनेर वस्ती (ता. गंगापूर) येथील शेतकरी वसंत गोविंद मिसाळ (वय 55) हे स्कुटीवरून (एमएच. 20 ईएम. 6889) नवीन कायगाव येथे दूध डेअरीला घेऊन जात असताना औरंगाबाद-नगर महामार्गावर नवीन कायगावच्या दिशेने वळण घेत असतांना नगर कडून भरधाव वेगात आलेल्या कारने (एमएच 20 डीपी 8811) जोराची धडक दिली. यात त्यांना जबर मार लागून गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी  त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. कार चालक पसार झाला आहे.

Web Title: One killed in car and two wheeler accident near at aurangabad nagar highway