नांदेड शहरात एकाचा खून; संशयीत ताब्यात

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

वजिराबाद ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कनकय्या कंपाऊंड परिसरात एका युवकाच्या मानेवर तलवारीचे घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना गुरूवारी (ता. 23) पहाटे दीडच्या सुमारास घडली. पोलिसांनी अवघ्या दोन तासातच संशयीत मारेकऱ्याला ताब्यात घेतले आहे. 

नांदेड : वजिराबाद ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कनकय्या कंपाऊंड परिसरात एका युवकाच्या मानेवर तलवारीचे घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना गुरूवारी (ता. 23) पहाटे दीडच्या सुमारास घडली. पोलिसांनी अवघ्या दोन तासातच संशयीत मारेकऱ्याला ताब्यात घेतले आहे. 

गुरूद्वारा गेट क्रमांक 5 येथे राहणारा व गुरूद्वारामध्ये सेवा करणारा युवक सुरजीतसिंग लहरसिंग मिलवाले (वय 25) हा पहाटे दीडच्या सुमारास घरी जात होता. यावेळी संशयीत मंदीपसिंग नानकसिंग काटघर रा. गुरूद्वारा गेट नंबर दोन, कुंभारगल्ली याने सुरजीतसिंग याला कनकय्या कंपाउन्डजवळ गाठले. अनैतीक संबंधातून त्याच्या पाठीमागून मानेवर तलवारीचा घाव घालून खून केला. यानंतर पोलिस उपाधिक्षक (शहर) अभिजीत फस्के, पोलिस निरीक्षक संदीप शिवले, फौजदार किरण पठारे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले.

मृतदेह शासकिय रूग्णालयात पाठवून दिला. त्यानंतर लगेच अवघ्या दोन तासात संशयीत मारेकऱ्यास ताब्यात घेतले. याप्रकरणी मयताचा नातेवाईक लक्कीसिगं मिलवाले याच्या फिर्यादीवरुन वजिराबाद आठण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: One killed in Nanded city