बीड जिल्ह्यात दुचाकी-ट्रक धडकेत एकजण ठार 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

ट्रक व मोटारसायकल अपघातात एकजण ठार, एक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. सात) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. शामप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर गेल्या काही दिवसांपासून अनेक खड्डे पडले आहेत.

परळी वैजनाथ (जि. बीड) - शहरातील शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर ट्रक व मोटारसायकल अपघातात एकजण ठार, एक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. सात) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. शामप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर गेल्या काही दिवसांपासून अनेक खड्डे पडले आहेत.

रविवारी सायंकाळी शेख कस्मी (वय २२, रा. लिंबगाव, बर्दापूर, ता. अबाजोगाई) येथून आपल्या दुचाकीवर (एमएच- ४४-७४९६) शहरात बायकोला भेटण्यासाठी येत असताना शामप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर आल्यावर समोरून येणाऱ्या ट्रकला (एमएच- ४४-९६८६) धडकल्याने जागीच मृत्यू झाला. शिवाजी प्रभाकर सुरवसे गंभीर जखमी झाला आहे. ट्रक ड्रायव्हर स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला असून शेख कस्मी यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One killed in two-wheeler-truck collision in Beed district