एक लाखाचे घरगुती रॉकेल जप्त

प्रल्हाद कांबळे 
बुधवार, 20 जून 2018

नांदेड : शासकिय वितरणाचे घरगुती वापराचे निळे रॉकेल काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी ठेवलेल्या साठ्यावर छापा टाकला. यावेळी तिघांना अटक करून त्यांच्याकडून एक लाखाचे एक हजार ७५० लिटर रॉकेल जप्त केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी शहराच्या नंदीग्राम सोसायटीमध्ये बुधवारी (ता.२०) सायंकाळी पाचच्या सुमारास केली. 

नांदेड शहरातील अवैध धंदे व सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांनी आपले सहकारी दत्ता वाणी, राजू पांगरेकर, तानाजी येळगे, व्यंकट गंगुलवार, शेख जावेद, शेख हिब्जूर रहेमान, गजाननन बैनवाड आणि मोतीराम पवार यांना सोबत घेऊन नंदीग्राम सोसायटी भागात गस्त घालत होते. यावेळी भारती यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी महेंद्रसिंग समशेरसिंग दिगवा यांच्या जागेत विटा रचून केलेल्या एका खोलीत महंमद ईसार महमंद सुलतान, राजकुमार देविसींग ठाकूर या दोघांना ताब्यात घेतले. 

त्या खोलीची झडती घेतली असता. निळ्या रंगाचे रॉकेल वेगवेगळ्या टाक्यांमध्ये साठवून ठेवल्याचे आढळून आले. त्याबद्दल माहिती विचारली असता त्यांची बोबडी वळली. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला. सदरचा रॉकेल साठा हा पिरबुऱ्हाननगर भागातील शेख बाबा शेख मुख्तार याचा असल्याचे समजले. पोलिसांनी त्यालाही अटक केली. या तिन्ही आरोपींना विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या पथकाचे पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना, अतिरिक्त पोलिस अधिक्षक मंगेश शिंदे यांनी कौतूक केले. 
 
Web Title: One lakh household kerosene seized