Parbhani : सेलूतील आरोग्य केंद्र चालते एकाच वैद्यकीय अधिकार्‍यावर

पद भरतीच नाही, रूग्णांची हेळसांड
Primary Health Centre
Primary Health Centreesakal

सेलू (जि.परभणी) : चिकलठाणा बुद्रूक (ता.सेलू) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची (Primary Health Centre) कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने अद्ययावत इमारत उभारली. मात्र रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरतीच केली नाही. त्यामुळे एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर या प्राथमिक केंद्राचा कारभार सुरू असल्याने (Selu) परिसरातील रूग्णांची हेळसांड होत आहे. तालुक्यात वालूर आणि देऊळगाव (गात) हे दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. देऊळगाव (गात) प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १२ प्राथमिक उपकेंद्रे, तर ४२ गावे येतात. वालूर अंतर्गत १४ उपकेंद्र आणि ५० गावांचा समावेश आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्या एक लाख २० हजार आहे. लोकसंख्येचा विचार करून आणि ग्रामीण भागातील रुग्णांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी. या उद्देशाने शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी खर्चून सर्व सोयीयुक्त चिकलठाणा (बु.) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत दीड वर्षापूर्वी बांधली वालूर आणि देऊळगाव (गात) प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावाचे विभाजन करून या प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्ण क्षमतेने सेवा देण्यात येईल. असे वाटत होते. (Parbhani)

Primary Health Centre
'OBC आरक्षण नष्ट करण्याचे पाप संघ, मोदी, फडणवीस, राज्य सरकारचे'

या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. आरोग्य सेवक एक, आरोग्य सेविका एक आणि सेवकांची चार पदे मंजूर आहेत. सद्य:स्थितीत या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यापैकी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची वालूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रति नियुक्ती करण्यात आली असल्याने एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा भरल्या नसल्याने एकच वैद्यकीय अधिकारी केवळ बाह्यरुग्ण तपासणी करतात. 'कोरोना'ची आरटीपीसीआर चाचणी आणि 'कोरोना' लसीकरणाशिवाय अन्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे या भागातील रुग्णांना सेलू, परभणी येथे उपचारासाठी जावे लागत आहे. या ठिकाणी महिला, पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना निवासस्थानाची सर्व सोयीयुक्त निवासस्थाने बांधली आहेत. परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरली नसल्याने केवळ टूमदार इमारत शोभेची वस्तू बनली आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅक्टर, कर्मचार्‍यांची रिक्त पदे भरण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com