esakal | एक-दोन नव्हे ५२ गाळेधारकांचे भाडे माफ
sakal

बोलून बातमी शोधा

भोकरदन: गाळेधारकांचे भाडेमाफ केल्याबद्दल राजाभाऊ देशमुख यांचा सत्कार करताना व्यापारी

लॉकडाउनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद राहिले, उधारी, उसनवारी करून दिवस ढकलावे लागले. त्यात पुन्हा दुकानांचे भाडे देण्याची चिंताही होतीच. राजाभाऊ देशमुख यांना ही बाब समजली. दातृत्वाचा परिचय देत त्यांनी एक-दोन नव्हे, तब्बल ५२ गाळेधारकांचे महिनाभराचे भाडे माफ केले आहे. 

एक-दोन नव्हे ५२ गाळेधारकांचे भाडे माफ

sakal_logo
By
तुषार पाटील

भोकरदन (जि.जालना) - कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात अनेकांचे व्यवसाय बंद राहिले. छोटे व्यापारी, व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले. भोकरदन शहरात ठिकठिकाणी गाळे असलेल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना ही बाब समजली. दातृत्वाचा परिचय देत त्यांनी एक-दोन नव्हे, तब्बल ५२ गाळेधारकांचे महिनाभराचे भाडे माफ केले आहे. 

भोकरदन शहरात श्री. देशमुख यांचे ठिकठिकाणी व्यापारी संकुल, गाळे आहेत. यात इंटरनेट कॅफे, कटिंग सलून, मोबाईल शॉपी, सायकल दुकान, कापड दुकान, इलेक्ट्रॉनिक दुकान, वडापाव सेंटरच्या माध्यमातून अनेक व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालतो. लॉकडाउनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद राहिले, उधारी, उसनवारी करून दिवस ढकलावे लागले. त्यात पुन्हा दुकानांचे भाडे देण्याची चिंताही होतीच.

हेही वाचा : जुईत पाऊस थुईथुई... 

गाळेधारकांसोबतच्या चर्चेत राजाभाऊ देशमुख यांना ही बाब लक्षात आली. त्यामुळे त्यांनी तब्बल ५२ गाळेधारकांचे एक महिन्याचे भाडे माफ केले. परिणामी गाळेधारक व्यापारी, व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

लॉकडाउनमध्ये अविरत कार्य 

लॉकडाउनच्या काळात शहरातील हजारो गरजू कुटुंब संकटात सापडलेले होते. त्यामुळे राजाभाऊ देशमुख यांनी शहरातील हजारो कुटुंबांना अन्नधान्य व दैनंदिन वस्तूंचे किट पुरवीत सामाजिक बांधिलकी जपली. त्यानंतर फळांचे वाटप व इतर मदतीच्या माध्यमातून अडचणीत सापडलेल्या, हातावर पोट असलेल्या अनेकांना दिलासा दिला. 

कोरोनाच्या संकटामुळे सगळ्यांचीच आर्थिक घडी विस्कटलेली आहे. शहरासह जिल्ह्यातील गाळेमालकांनीदेखील आपापल्या परीने भाडेकरूंना सवलत, भाडेमाफी देण्याचा प्रयत्न करावा. या संकटात एकमेकांना कशी मदत करता येईल ते पाहावे. 
- राजाभाऊ देशमुख, 
भोकरदन 

loading image