फेसबुकच्या खात्यात आणखी एक गुन्हा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

परभणी : लग्न झाले नसतांनाही लग्न झाल्याची पोस्ट टाकून फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अजिंक्य मंगेशराव घोडेस्वार ऊर्फ घोडे पाटील (रा. रामदास नगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पाच जुलै ते नऊ जुलै या दरम्यान त्यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते खोलून त्यांचे लग्न झाले असल्याचा संदेश प्रसारीत करण्यात आला. नाहक बदनामी केल्याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर तट करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One more crime to facebooks account