औरंगाबादेतील दंगलीचा दुसरा बळी; सतरा वर्षीय मुलगा ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

फायर आर्मचे उपचार सुरु होते
सूत्रांनी माहिती दिली की, जखमी अब्दुल हरीश याच्यावर खासगी रुग्णालयात फायर आर्मचे उपचार सुरु होते, पण शर्तीच्या प्रयत्नानंतर त्याचा मृत्यू झाला. धावणी मोहल्ल्यातील तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद : शहरातील मोतीकारंजा, शहागंजसह इतर भागात शुक्रवारी (ता. 11) उसळलेल्या दंगलीत एका जेष्ठ नागरिकाचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा शनिवारी (ता. 12) सकाळी साडेनऊ वाजता एका सतरा वर्षीय जखमी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अब्दुल हरीश अब्दुल हारून कादरी (वय 17, रा. जिन्सी) असे मृताचे नाव आहे. जिन्सी भागात दंगलीत तो सापडला व जखमी झाला. त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु प्रकृती अत्यंत खालावल्याने त्याला घाटी रुग्णालयात शनिवारी (ता. 12) पहाटे दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

फायर आर्मचे उपचार सुरु होते
सूत्रांनी माहिती दिली की, जखमी अब्दुल हरीश याच्यावर खासगी रुग्णालयात फायर आर्मचे उपचार सुरु होते, पण शर्तीच्या प्रयत्नानंतर त्याचा मृत्यू झाला. धावणी मोहल्ल्यातील तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title: one more dead in riot Aurangabad