अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये अजून एकाची भर!

प्रल्हाद कांबळे 
बुधवार, 17 जुलै 2019

-  बालगुन्हेगाराचा वापर करून त्याच्यामार्फत दुचाकी चोरी करणारी टोळीला वजिराबाद पोलिसांनी अटक केली.

- त्यांच्याकडून बारा दुचाकी जप्त केल्या.

- बालगुन्हेगाराला निरीक्षणगृहात तर दोघांना शनिवार (ता. २०) पर्यंत पोलिस कोठडीत पाठविले असल्याची माहिती पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नांदेड : बालगुन्हेगाराचा वापर करून त्याच्यामार्फत दुचाकी चोरी करणारी टोळीला वजिराबाद पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून बारा दुचाकी जप्त केल्या. बालगुन्हेगाराला निरीक्षणगृहात तर दोघांना शनिवार (ता. २०) पर्यंत पोलिस कोठडीत पाठविले असल्याची माहिती पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नांदेड शहर आणि जिल्ह्यात दुचाकी चोरांनी डोके वर काढल्याने पोलिस यंत्रणा चक्रावून गेली होती. जिल्ह्यात दरमहा जवळपास वीस ते तीस दुचाकी चोरीला जात असल्याची माहिती जाधव यांनी दिली. दुचाकी चोरांना पकडण्यासाठी (ता. एक) जूलैपासून विशेष पथक कार्यरत केले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना याबाबतच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांच्या गुन्हे शाेध पथकाचे प्रविण राठोड यांच्या पथकानी या दुचाकी चोरांचा छडा लावला.

सुगाव (ता. नांदेड) येथील एका बालगुन्हेगाराचा वापर करून ही दुचाकी चोरांची टोळी सक्रीय झाली होती. शहरातील शिवाजीनगर, भाग्यनगर, वजिराबाद ठाण्याच्या हद्दीतून मास्टर किल्लीने दुचाकीचे लॉक तोडून अल्पवयीन बालक दुचाकी पळवत होता. पळविलेली दुचाकी आपला म्होरक्या प्रफुल्ल भिसे (वय २५) आणि दिनेश सिध्दार्थ भिसे (वय २१) यांच्या स्वाधीन करीत असे.

त्यानंतर हे दोघे आणि त्यांचे इतर साथिदार या दुचाकींची विल्हेवाट लावत असत. प्रफुल्ल भिसे याला मुंबई येथून अटक केली. या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता अल्पवयीन आरोपीला निरीक्षणगृहात तर दोघांने पोलिस कोठडीत पाठविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One more minor criminal to the list