नांदेड : तिक्ष्ण हत्याराने एकाचा खून; उमरी ठाण्यात गुन्हा दाखल 

प्रल्हाद कांबळे
रविवार, 7 एप्रिल 2019

भिकाऱ्यासारखे काय पैसे मागतोस, असे म्हणून त्याला परत पैसे देण्यास नकार दिला. हा राग मनात धरुन नागोराव मेटकर याने झोपेत असलेल्या रामु पवार याच्या पोटात तिक्ष्ण हत्याराने जबर वार केला.

नांदेड : दारु पिण्यास पैसे का दिले नाही म्हणून तिक्ष्ण हत्याराने पोटात मारून खून करणाऱ्या एकाविरुध्द उमरी पोलिस ठाणयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ता. 28 मार्चला रात्री एकच्या सुमारास घडली होती. उपचारादरम्यान ता. 5 एप्रिलला रामु हनमंत पवार याचा मृत्यू झाला. 

उमरी (जि. नांदेड) येथील रामु हनमंत पवार याला होळीच्या अगोदर नागोराव बलाजी मेटकर याने दारु पिण्यासाठी पैसे मागितले होते. परंतु त्याने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा त्याला पैसे मागितले. यावेळी भिकाऱ्यासारखे काय पैसे मागतोस, असे म्हणून त्याला परत पैसे देण्यास नकार दिला. हा राग मनात धरुन नागोराव मेटकर याने झोपेत असलेल्या रामु पवार याच्या पोटात तिक्ष्ण हत्याराने जबर वार केला. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्याचा ता. 5 एप्रिलला अखेर मृत्यू झाला. या प्रकरणी गंगाधर रामा पवार यांच्या फिर्यादीवरुन उमेरी पोलिस ठाणयात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नागोराव मेटकर हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास पोलिस निरीक्षक अभिमन्य सोळंके हे करीत आहेत.

Web Title: One murder In the case of Umeri Thane filed in Nanded