औरंगाबादेतील दंगल, जाळपोळीत दिव्यांगाचा होरपळून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

‌सिटीचौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगनलाल छगनलाल बन्सीले (वय 62, रा. स्टेट बँकेजवल, शहागंज) असे मृताचे नाव आहे. शहागंज परिसरातील एका दुकानात ते शुक्रवारी (ता. 12) झोपले होते. रात्री उसळलेल्या दंगलीनंतर शनिवारी (ता. 12) पहाटे अज्ञात दंगेखोरांची या दुकानाला आग लावली.

औरंगाबाद : दोन गटात उसळलेल्या दंगलीनंतर शनिवारी (ता. 12) पहाटे साडेपाचच्या सुमारास दंगेखोरांची एक दुकान पेटवून दिले. या घटनेत आगीत होरपळून एका दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाला. हि घटना शहागंज भागात घडली.

‌सिटीचौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगनलाल छगनलाल बन्सीले (वय 62, रा. स्टेट बँकेजवल, शहागंज) असे मृताचे नाव आहे. शहागंज परिसरातील एका दुकानात ते शुक्रवारी (ता. 12) झोपले होते. रात्री उसळलेल्या दंगलीनंतर शनिवारी (ता. 12) पहाटे अज्ञात दंगेखोरांची या दुकानाला आग लावली. यानंतर दुकानाला आगीने वेढले. यामुळे जगनलाल याना जाग आली. आग पाहून त्यांनी जीव वाचवण्यासाठी आटापिटा केला. परंतु ते दिव्यांग असल्याने त्याना लवकर बाहेर पडता आले नाही आणि यातच त्यांचा होरपळून मृत्यू झाला. असे सिटीचौक पोलिसानी सांगितले. दंगलीत रात्रीपासून 32 जखमी घाटीत दाखल झाले असून त्यात एक गंभीर आहे, मेहब शेख असे त्याचे नाव आहे. घाटी रुग्णालयात उपचारानंतर नऊ जणांना डॉक्टरांना सुटी दिली आहे.

‌हिंसक प्रकारानंतर शहरातील शहागंज, मोतीकारंजा आणि इतर भागात शांतता आहे. या भागात चोख बंदोबस्त आहे. मोतीकारंजा भागात टपरीचा वाद होता त्यातुन हा प्रकार घडला, तसेच नळ कनेक्शन तोडल्याचा रोष होता हे कारणही हिंसक घटनांना कारणीभूत असू शकते. असे प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

Web Title: one person died in riot Aurangabad