मांगूर माशाची विक्रीवर कायमची बंदी; एकाने घेतले विष

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नांदेड :  केंद्र सरकार व राज्य सरकारने मांगूर उर्फ मारुफ या माशांच्या विक्रीवर कायमची बंदी घातली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात या माशांची सर्रास विक्री होत आहे. हा मासा विक्री करणाऱ्यांवर व परवानगी देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने एका युवकाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मंगळवारी (ता.११) दुपारी एकच्या सुमारास घडला. 

मत्स्य व्यवसाय विभागानी मच्छीमार सहकारी संस्था यांना नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी अटी व शर्ती लावलेल्या आहेत. पण हे मच्छीमार सहकारी संस्था येथील सहाय्यक आयुक्तांच्या आशीर्वादाने सर्व नियम धाब्यावर बसवून सर्रास या माशाची विक्री करण्यात येते. मत्स्य कार्यालय त्यांच्यावर ठोस कारवाई करीत नाही. याबाबत तीन नोव्हेंबर पासून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुदखेड तालुक्यातील बारड येथील सुनील धूतराज यांनी उपोषण केले. परंतु जिल्हा प्रशासन किंवा मत्स्य प्रशासनाने उपोषण कर्त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.

अखेर संतप्त झालेल्या उपोषण कर्त्यांनी मंगळावरी दुपारी पोलिस प्रशानाला निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात किटक नाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले. पोलिस वाहनातून त्याला शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. पोलिस निरीक्षक संदीप शिवले व उपाधिक्षक अभिजीत फस्के यांनी घटनास्थळी जावून पहाणी केली. उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, उपप्रादेशीक मत्स्य कार्यालय लातूर आणि सहाय्यक आयुक्त मत्स्य नांदेड यांच्या निषेधार्थ हे पाऊल उचलल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. त्याच्या विरूध्द गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती. 

Web Title: The one take poison for Permanent ban on the sale of Mangur Fish