शहरात एक हजार टन कचऱ्याचे ढीग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद - ओल्या कचऱ्याचा प्रश्‍न काही प्रमाणात मिटला असला तरी शहरातील रस्त्यावर मोकळ्या जागेत अद्याप एक हजार टन कचरा पडून असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सोमवारी (ता. २२) सांगितले. 

महापालिका पैठण रोडवरील सकलेचा कंपनीला सुका कचरा देत होती; मात्र कंपनीने कचरा घेणे बंद केल्यामुळे एक हजार टन कचरा पडून आहे. भोंबे यांनी सांगितले की, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आलेल्या मशीनचा एक सेट चिकलठाणा येथे बसविला असून, प्रक्रियाही सुरू केली आहे. पडेगाव आणि हर्सूल येथे लवकरच उर्वरित दोन मशीनचे सेट बसविले जातील. विरोधामुळे हर्सूल येथील प्रक्रिया केद्रांवर कचरा टाकणे थांबविले होते; मात्र आता पुन्हा एकदा मंगळवारपासून (ता. २३) हर्सूलमध्ये कचरा टाकला जाणार आहे.

शहागंज येथील शेड हटविणार
शहागंज येथील कचऱ्याच्या शेडमध्ये वारंवार आग लावली जात आहे. त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. हे शेड काढून टाकण्याची मागणी तेथील नगरसेवकांनी केली. त्यानुसार प्रभाग-२ च्या अधिकाऱ्यांना पत्र दिले असून, लगेच कारवाई केली जाणार असल्याचे भोंबे यांनी स्पष्ट केले.

Web Title: one thousand tone garbage in city