रात्री छतावर एक महिला दोन तरुणांसोबत होती, दारूही ढोसली अन्‌ मग...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

बीड येथील जिल्हा रुग्णालयाच्या छतावर एक महिला व दोन तरुण दारूच्या नशेत अर्धनग्न होऊन अश्‍लील चाळे करत असल्याचे उघड झाले. यानंतर सहाव्या दिवशी बीड शहर पोलिस ठाण्यात पोलिस अधीक्षकांच्या आदेशावरून गुन्हा नोंद झाला आहे. 
 

बीड - जिल्हा रुग्णालयाच्या छतावर नशा करून एक महिला व दोन तरुण अर्धनग्न होऊन अश्‍लील चाळे करत असल्याचा प्रकार सोमवारी (ता. चार) रात्री उघडकीस आला होता. या प्रकरणात मात्र गुन्हा नोंद झाला नव्हता. याबाबत पोलिस अधीक्षकांना माहिती कळताच त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहा दिवसांनी शुक्रवारी (ता. आठ) एका महिलेसह दोन तरुणांवर बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

Beed News
बीड : जिल्हा रुग्णालयाच्या छतावर मिळालेले साहित्य

अंकुश विष्णु नैराळे (वय 34, रा. पिठी नायगाव, ता. पाटोदा), अशोक अभिमान लांडगे (वय 29, रा. वडगाव गुधा, ता. बीड) हे दोघेही खासगी रुग्णवाहिकेवर चालक आहेत. या दोघांसोबत एक महिला (वय 26, रा. घाटनांदूर, ता. भूम) होती.

हेही वाचा - अरेरे...पत्नी नांदायला येईना, पतीने उचलले हे पाऊल...

या तिघांनी दारूच्या नशेत जिल्हा रुग्णालयाच्या छतावर जाऊन अर्धनग्न होत अश्‍लील छाळे केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. अखेर सहावी दिवशी जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांच्या फिर्यादीवरुन कलम 296, 34 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास बीड शहर पोलिस करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One woman and two young men arrested in beed

फोटो गॅलरी