तीर्थपुरीत मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

तुकाराम शिंदे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

याविषयी अधिक माहिती अशी अंतरवाली टेंभी  येथील गणेश तुकाराम नन्नवरे हे शनिवारी (ता. 11) रात्री सात ते आठच्या दरम्यान शेतात गेला होते. परंतु रात्री तो परत आलाच नाही.

तीर्थपुरी (जि. जालना) : घनसवांगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथील गणेश तुकाराम नन्नवरे (वय 40) या तरुणाने मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी  शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता.12) पहाटे सहा वाजेच्या सुमारास उघडीस आली. 

याविषयी अधिक माहिती अशी अंतरवाली टेंभी  येथील गणेश तुकाराम नन्नवरे हे शनिवारी (ता. 11) रात्री सात ते आठच्या दरम्यान शेतात गेला होते. परंतु रात्री तो परत आलाच नाही. त्यामुळे त्यांचे बंधू पाराजी नन्नवरे सकाळी त्याला पाहण्यासाठी शेतात गेले असता, गणेश नन्नवरे शेतात मृत अवस्थेत आढळून आला. त्याने विष प्राशन केले असल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती गावात कळताच नागरिकांनी घटनाथळकडे धाव घेतली. त्यांच्या खिशात आरक्षणाच्या मागणीबाबत चिट्टी आढळून आली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: one young mam commits suicide for Maratha reservation arthpur jalna