कांद्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी दळणवळण वाढवा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

औरंगाबाद - नाशिक आणि परिसरात शेतकऱ्यांपुढे कांद्याचा प्रश्‍न उभा राहिला आहे. त्यामुळे त्यावर उपाय म्हणून पिकविलेले कांदे अन्यत्र नेण्यासाठी रेल्वेने दिवसाला किमान दोन रॅक उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रविवारी (ता. 30) औरंगाबादेत केली.

येथील विभागीय आयुक्‍तालयात रस्त्यांच्या कामाची आढावा बैठक झाली. त्यानंतर पटेल यांनी गडकरी यांची भेट घेऊन नाशिकच्या कांदा प्रश्नाची कैफियत मांडली. कांद्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर रेल्वे विभागाने कांदा वाहण्यासाठी दिवसाकाठी किमान दोन रॅक उपलब्ध करून द्यावेत, सध्या दोन ते तीन दिवसाला एकच रॅक मिळत असल्याने कांदा उत्पादकांचा माल पडून असल्याचे आपण गडकरी यांना सांगितल्याचे पटेल म्हणाले. यंदा कांदा लवकर आला आणि जुना कांदाही भरपूर असल्यानेही अडचणी उभ्या राहिल्या असल्याचे ते म्हणाले. सद्यःपरिस्थितीत बदल करायचा असल्यास निर्यात वाढवण्यावर भर द्यावा लागणार असल्याचे त्यांनी तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Web Title: Onion Issue Pasha Patel Nitin gadkari