औरंगाबाद-पुणे महामार्गावर कांद्याचा ट्रक उलटला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

गंगापूर (जि. औरंगाबाद) - औरंगाबाद-पुणे महामार्गावर कांदा भरलेला ट्रक ढोरेगाव (ता. गंगापूर) येथील शिवना नदीवरील पुलाला धडकून शुक्रवारी पहाटे उलटला. त्यावर शेकडो क्विंटल कांदा पसरल्याने सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. या कुठलीही जीवितहानी झाली नाही. ग्रामस्थांच्या मदतीने कांदे गोळा करून मार्ग मोकळा करण्यात आला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद नव्हती.
Web Title: onion truck overturn accident