भाव नसल्याने कांदा सडला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 मार्च 2019

टाकरवण - चांगल्या दराच्या अपेक्षेने लागवड केलेल्या कांद्याची परिसरात काढणी सुरू आहे. परंतु बाजारात योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. 

टाकरवण - चांगल्या दराच्या अपेक्षेने लागवड केलेल्या कांद्याची परिसरात काढणी सुरू आहे. परंतु बाजारात योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. 

चार पैसे मिळतील या अपेक्षेने हजारो रुपये खर्च करून साठवलेला कांदा आता गुदमरून सडू लागला आहे. तर किलोला चार-पाच रुपयांच्या पुढे वाढ होत नसल्याने व हा भाव परवडणारा नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. नवा कांदाही बाजारात येऊ लागल्याने कांदा साठवून ठेवावा की नाही, भाव वाढतील का, आता विक्री केला अन्‌ उद्या भाव वाढले तर असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. भाव नसल्याने लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. एकीकडे दुष्काळाने तर दुसरीकडे भाव नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. कांदा हा जास्त दिवस साठवून ठेवता येत नसल्याने शेतकरी तो साठवून ठेवू शकत नाहीत. यात आजही टाकरवणसह परिसरातील अनेक गावांमध्ये कांदा शेतामध्ये पडून आहे. त्यामुळे शेतकरी ऐन दुष्काळात संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांद्याचा भाव वाढेल या हिशेबाने कांदा शेतातच काढून ठेवला आहे. अनेक शेतकऱ्यांना कांदा साठवण्यासाठी जागा नाही. अशा काही शेतकऱ्यांनी शेतात झाडाखाली कांदा काढून ठेवला आहे. या भागात कांदा चाळींची संख्या कमी असल्याने तोही पर्याय नाही. उन्हाच्या तडाख्यात कांदे टिकत नाहीत. अशा दुहेरी अडचणीत शेतकरी सापडले आहेत. 

कांद्याचा खत म्हणून वापर 
काही शेतकऱ्यांनी कांदा विकणे आणि फेकण्यापेक्षा तो शेतातच टाकून जैविक खत म्हणून वापर करीत आहेत. काही केल्या बाजारात भाव मिळत नसल्याने कवडीमोलाने कांदा विकण्यापेक्षा या कांद्याचे खत केलेले काय वाईट, अशी भावना शेतकऱ्यांची झाली आहे. 

कांद्याला उष्णतेचा धोका 
वातावरणात बदल झाला असून, गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. कांदा उत्पादक शेतकरी कांदा काढण्यासाठी शेतीमध्ये मग्न असल्याने कांद्याला वाढत्या उष्णतेची मोठी झळ बसत आहे. अनेक शेतकरी शेतात साठवून ठेवलेल्या कांद्याचा उन्हापासून बचाव करण्यासाठी धडपड करीत असल्याचे चित्र आहे. 

Web Title: Onions have no prices

टॅग्स