ऑनलाइन फूड डिलिव्हरी  हॉटेलचालकांसाठी ‘लय भारी’

प्रकाश बनकर 
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

औरंगाबाद - ऑनलाइनच्या जमान्यात खाद्यपदार्थांचीही फूड डिलिव्हरी शहरात सुरू झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. ऑनलाइन ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याने व्यवसायातही वाढ झाली आहे. 

औरंगाबाद - ऑनलाइनच्या जमान्यात खाद्यपदार्थांचीही फूड डिलिव्हरी शहरात सुरू झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. ऑनलाइन ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याने व्यवसायातही वाढ झाली आहे. 

शहरात तीन ते चार फूड ॲण्ड डिलिव्हरी सेवा देणाऱ्या कंपन्या आल्यामुळे ऑनलाइन ऑर्डरमध्येही मोठी वाढ झाली आहे. या ऑनलाइन कंपन्यांचा फायदा छोट्या हॉटेल व्यावसायिक, पानटपरीचालक, खानावळ, छोट्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना झाला आहे. त्यांच्या नियमित होणाऱ्या व्यवसायात आता दहा ते पंधरा टक्‍के वाढ झाली आहे. ऑनलाइन कंपन्यांमुळे ग्राहकांनाही त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांवर २० ते २५ टक्‍क्‍यांहून अधिक सवलत मिळत असल्यामुळे खवय्येही या ॲपच्या माध्यमातून खाद्यपदार्थ मागवीत त्यावर ताव मारीत आहेत. एवढेच नाही तर यामुळे शहरातील महाविद्यालयीन तरुणांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत.

आता किराणाही ऑनलाइन
सर्वच क्षेत्रांत ऑनलाइनचा बोलबाला झाल्यामुळे किरणा दुकानदारही ऑनलाइन झाले आहेत. व्हॉटस्‌ॲप व फोन, ई-मेलवरच्या माध्यमातून ऑर्डर घेत आहेत. यापुढे जाऊन ‘किराणा भरो’ या ऑनलाइन ॲपच्या माध्यामतून किराणा सामान घरपोच पोचविण्याची सुविधाही करण्यात आली आहे. यश उपाध्ये आणि ऋषिकेश पवार या दोघांनी ही ऑनलाइन किराणाची संकल्पना सुरू केली आहे. स्वत: ऑर्डर घेत ते घरपोच पोचविण्याची सुविधा यात आहे. 

ऑनलाइन कंपन्यांमुळे लघू खाद्यविक्रेते, खानावळचालकांना मोठा फायदा झाला. यात आणखी एक म्हणजे ग्राहक हा प्रवासी होता. ऑनलाइनमुळे मला स्थानिक ग्राहकांपर्यंत पोचता आले. म्हणजे एसी हॉटेलमध्ये जाणारेही आता ऑनलाइनमुळे आमच्याकडे वळले. माझा व्यवसाय ५० टक्‍के वाढला. यासह दोन हजार युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
- एकनाथ गोपाळ माजलगावकर, व्यावसायिक.

Web Title: Online Food Delivery in aurangabad