एमआयडीसीकडून आता ‘ऑनलाइन’च अर्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

औरंगाबाद - राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये असलेल्या कामांसाठी करावयाचे अर्ज आता केवळ ऑनलाइन स्वीकारले जाणार आहेत. राज्यभरात शनिवारपासून (ता. एक) ऑनलाइन यंत्रणा अमलात आली असून औद्योगिक भूखंडांचा कारभार ऑनलाइन करण्यात आला आहे. रहिवासी क्षेत्रातील अर्जाची ऑनलाइन स्वीकृती तांत्रिक कारणास्तव महिनाभराने सुरू होणार आहे. 

महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाच्या कारभाराला गती देण्यासाठी ऑनलाइन कारभाराची कास धरण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रात कोणताही भूखंड घ्यायचा, विकायचा, त्यावर काम करायचे आदी गोष्टींसाठी एमआयडीसीकडे धाव घ्यावी लागते. यासाठी अर्जांचा धांडोळा घेऊन एमआयडीसीच्या कार्यालयात खेटे मारणे थांबणार आहे. एमआयडीसीतर्फे पुरविण्यात येणाऱ्या सर्व सुविधांसाठी आता केवळ ऑनलाइनच अर्ज करता येणार आहे. ही सुविधा १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. 

रहिवासी क्षेत्रासाठी अवकाश
औद्योगिक क्षेत्रातील भूखंडांची कामे करण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा कार्यरत झाली आहे. मात्र, एमआयडीसीच्या हद्दीत असलेल्या रहिवासी क्षेत्रातील कामांसाठी अद्याप ही यंत्रणा अमलात आलेली नाही. त्यातील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी महिनाभराचा अवधी लागणार असून त्यानंतर रहिवासी क्षेत्रासाठीही ऑनलाइन यंत्रणा अस्तित्वात येणार आहे. 

यांच्यासाठी ऑनलाइन अर्ज 
चेंज इन ॲक्‍टिव्हिटी, लॅण्ड यूज, नेम ऑफ कंपनी, बीसीसी, फायनल लीज, लीज परमिशन, मॉर्गेज कन्सेन्ट, मार्जिनल डिस्टन्स वेवर, प्री-डिटरमाईन्ड लीज, प्रॉपर्टी कार्ड, सबडिव्हीजन, सबलीझिंग, सबलेटिंग, सरेंडर ऑफ प्लॉट, प्लॉट ट्रान्सफर, प्रायोरिटी लॅण्ड अलॉटमेंट, डायरेक्‍ट लॅण्ड अलॉटमेंट, लॅण्ड ॲप्लिकेशन, प्लॉट रजिस्ट्रेशन.

एमआयडीसीकडे राज्यभर होणारा अर्ज भरणा आता ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आला आहे. रहिवासी क्षेत्रातील काही तांत्रिक अडचणी दूर करून तेथील अर्जही महिनाभरात ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.    
- सोहम वायाळ, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

Web Title: Online Form for MIDC Job