Online Fraud : जालन्यात ऑनलाइन गंडा सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud crime news

Online Fraud : जालन्यात ऑनलाइन गंडा सुरूच

जालना : मोबाईल फोनवरून क्रेडिट कार्डची माहिती घेत ऑनलाइन गंडा घालण्याचे प्रकार सुरूच आहेत. दरम्यान, शहरातील दोन जणांची ऑनलाइन फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हे नोंद झालेले आहेत.

शहरातील ढवळेश्वर येथील एसटी कर्मचारी विठ्ठल फकीरबा सोनवणे यांना गुरुवारी एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला. बँकेचे अधिकारी असल्याचे सांगत समोरील अनोळखी व्यक्तीने श्री.सोनवणे यांच्याकडून क्रेडिट कार्डची माहिती घेतली. त्यानंतर क्रेडिट कार्ड व बँकेच्या खात्यातून लबाडीने परस्पर ९९ हजार २३८ रुपये ऑनलाइन काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी श्री.सोनवणे यांच्या फिर्यादीवरून संशयित मनीष शर्मा याच्याविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास सायबर पोलिस करीत आहेत. अन्य घटनेत कचेरी रोडवरील वाणी गल्ली येथील प्रकाश शिवराजअप्पा मठपती यांना ता.१२ ऑगस्टला मोबाईलवरून फोन आला. त्यात अनोळखी व्यक्तीने, तुमचा २ हजार ४९९ रुपयांचा सीपीपी प्लान आहे, तो बंद करून पाच लाख रुपयांचा नवीन प्लान सुरू करू असे सांगितले. नंतर माहिती घेत क्रेडिट कार्डवरील २७ हजार ३४५ रुपये परस्पर ऑनलाइन काढून घेतले. याप्रकरणी श्री.मठपती यांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सायबर पोलिस करीत आहेत.

Web Title: Online Fraud Jalna Credit Card Details Mobile Phone Amount Scam Cyber Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..