सफारी गाडी जिंकल्याचे सांगत तरुणाची ऑनलाईन फसवणूक

online fraud in latur District
online fraud in latur District

लातूर : तुमचे अभिनंदन. आमच्या लकी ड्राँमध्ये तुम्ही तब्बल 12 लाख 60 हजार रुपयांची सफारी गाडी जिंकला आहात... असा दूरध्वनी जमशेदपूरमधून लातूरमधील एका तरुणाला आला आणि हा तरुण तिथेच जाळ्यात अडकला. टप्याटप्याने तब्बल तीन लाख रूपये त्याने ऑनलाईन पद्धतीने भरले. पण गाडी काही केल्या मिळाली नाही. असा प्रकार लातूरमध्ये सोमवारी उघडकीस आला आहे.

शिवाजी व्यंकट जाधव (वय 28) असे या तरुणाचे नाव आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. त्याला 13 ते 20 ऑक्टोबर दरम्यान वारंवार दूरध्वनी करून संबंधित कंपनीने पैशांची मागणी केली. त्यामुळे जाधव यांनी 2 लाख 87 हजार 900 रुपये ऑनलाईन पद्धतीने भरले.

इतके पैसे भरूनही गाडी देण्याबाबत संबंधित कंपनीतून माहिती मिळत नव्हती. त्यामुळे आपली मोठी फसवणूक झाल्याचे जाधव यांच्या लक्षात आले. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गोविंद सिंग, पूर्णा महंता (जमशेदपूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com