इस्त्रोतर्फे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रश्‍नमंजूषा स्पर्धा 

संदीप लांडगे
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

औरंगाबाद- इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेची जगभरात चर्चा आहे. चांद्रयानातील रोव्हर "प्रग्यान' 7 सप्टेंबरला चंद्राच्या पृष्ठभूमीवर लॅण्ड होणे अपेक्षित आहे

औरंगाबाद- इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेची जगभरात चर्चा आहे. चांद्रयानातील रोव्हर "प्रग्यान' 7 सप्टेंबरला चंद्राच्या पृष्ठभूमीवर लॅण्ड होणे अपेक्षित आहे. यानिमित्त अवकाश कार्यक्रमाबद्दल देशातील विद्यार्थ्यांमध्ये जाणीवजागृती वाढविण्यासाठी इस्त्रो व www.mygov.in यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ऑगस्ट ते 25 ऑगस्टदरम्यान ऑनलाईन प्रश्‍नमंजूषा सुरु आहे. 

या प्रश्‍नमंजूषेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. तसेच प्रश्‍नमंजूषेत उत्तम गुण मिळविणाऱ्या प्रत्येक राज्यातील गुणानुक्रमे दोन विद्यार्थ्यांना (इयत्ता आठवी ते दहावी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत इस्त्रो (बंगळुरू) येथे चांद्रयान-2 लॅडिंगचे थेट प्रक्षेपण पाहाण्याची संधी मिळणार आहे. 

नियमावली 
ही ऑनलाईन प्रश्‍नमंजूषा http://quiz.mygov.in/quiz/online-space-quiz या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन प्रश्‍नमंजूषेमध्ये दहा मिनीटांच्या कालावधीत कमाल 20 प्रश्‍न सोडवायचे आहेत. 
- प्रश्‍नमंजूषा सोडविण्यासाठी पालक आपल्या पाल्यांना प्रश्‍नांचे भाषांतर करुन सांगण्यास मदत करु शकतील. 
- या संदर्भातील अधिक अटी व शर्ती वरील लिंकवर दिल्या आहेत. 
- प्रश्‍नमंजूषा सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांना mygov.in या पोर्टलवर नावनोंदणीसाठी एसएमएस द्वारे आपले लॉगीन आयडी व पासवर्ड तयार करुन घेण्याची सोय आहे. यासाठी आपल्या मोबाईलवर 7738299899 या क्रमांकावर MYGOVUSERNAME ( USERNAME च्या ठिकाणी आपले नाव) असा एसएमएस पाठवून लॉगीन तपशील तयार करु शकता. 
- स्पर्धेची अंतिम तारीख 25 ऑगस्ट आहे. सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या शाळांतील जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रश्‍नमंजूषेमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण (माध्यमिक विभाग) यांनी केले.
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online quiz competition for students