esakal | बीड : तुरीच्या शासकीय खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीस सुरवात, १७ केंद्रावर होणार खरेदी
sakal

बोलून बातमी शोधा

Tur

शासनाच्या आधारभूत किमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम २०२०-२१ मध्ये तूर पिकाच्या खरेदीसाठी सोमवारपासून (ता. २८) ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

बीड : तुरीच्या शासकीय खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीस सुरवात, १७ केंद्रावर होणार खरेदी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : शासनाच्या आधारभूत किमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम २०२०-२१ मध्ये तूर पिकाच्या खरेदीसाठी सोमवारपासून (ता. २८) ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १७ केंद्रावर शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी करण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी तत्काळ ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन बीडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी मिलिंद कापुरे यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये ऑनलाइन नोंदणीसाठी बीड, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, घाटनांदूर, बर्दापूर, धारूर, शिरुरघाट, कडा, कासारी, शिराळ, मंगरुळ, शिरूर, फुलसांगवी, पारणेर, पाटोदा या खरेदी केंद्रावर तूर या पिकाची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांनी नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी. तूर पिकाची आधारभूत किंमत सहा हजार रुपये प्रती क्विंटल आहे. नोंदणीसाठी आपले आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे छापील पासबूक (अकाउंड नंबर, आयएफसी कोड स्पष्ट दिसावा), ऑनलाइन सातबारा उतारा, तलाठी यांच्या सही शिक्यासह पीकपेरा प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसह तूर या पिकाची नोंदणी करावी, असे आवाहन मिलिंद कापुरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बीड यांनी केले आहे.


 

Edited - Ganesh Pitekar

loading image