मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये उरले  फक्‍त 0.47 टक्‍केच उपयुक्‍त पाणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

मराठवाड्यातील 872 प्रकल्पांत जूनअखेर क्षमतेच्या केवळ 0.47 टक्‍केच उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे.

औरंगाबाद -  मराठवाड्यातील 872 प्रकल्पांत जूनअखेर क्षमतेच्या केवळ 0.47 टक्‍केच उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे. लांबलेल्या व असमान बरसणाऱ्या पावसाने अजून प्रकल्पांची तहान भागविण्याचे काम सुरू केले नसल्याची स्थिती आहे. 

मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पांत 0.21 टक्‍के, 75 मध्यम प्रकल्पांत 0.81 टक्‍के, 749 लघू प्रकल्पांत 1.16 टक्‍के, गोदावरी नदीवरील 13 बंधाऱ्यांत 0.03 टक्‍के, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील 24 बंधाऱ्यांत उपयुक्‍त पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याची स्थिती आहे. 11 मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ निम्न मनार प्रकल्पात 8 टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. इतर सर्व दहा मोठे प्रकल्प मृतसाठ्यात आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील 16 मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब शिल्लक नाही. हीच स्थिती लातूरमधील 8, उस्मानाबादमधील 17 व परभणीमधील 2 मध्यम प्रकल्पांची आहे. नांदेडमधील 9 मध्यम प्रकल्पांत 3 टक्‍के, तर बीडमधील 16 व जालन्यातील 7 मध्यम प्रकल्पांत 2 टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 0.47% of useful water in Marathwada projects