महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचीच मराठा आरक्षणाला आडकाठी- अॅड. शिवाजीराव जाधव

सुप्रीम कोर्टाचे वकील तथा भाजपाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष ऍड. शिवाजीराव जाधव यांचा आरोप
शिवाजीराव जाधव
शिवाजीराव जाधव

वसमत (जिल्हा हिंगोली ) : मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द होण्यास महाविकास आघाडीच कारणीभूत आहे. यातील प्रमुख नेत्यांनाच मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असे वाटत असल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयातील (Suprim court) वकील तथा भाजपचे हिंगोली जिल्हाध्यक्ष अॅड. शिवाजीराव जाधव (Ad. Shivajirao Jadhav) यांनी केला. ते वसमत (जिल्हा हिंगोली) येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. Only major leaders of Mahavikas Aghadi obstruct Maratha reservation- Adv. Shivajirao Jadhav

शिवाजीराव जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुखपत्रामध्ये व्यंगचित्र काढून मराठा मूक मोर्चाला मुक्का मोर्चा असे संबोधिले होते. यावरुनच मराठा समाजासाठी उद्धव ठाकरे किती गंभीर आहेत हे लक्षात येते. 370 कलम व आरक्षण यामध्ये खूप फरक आहे. आपले अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऊठसूट केंद्रावर टीका करतात. कुठलाही अभ्यास न करता व निकालाची जजमेंट न वाचता मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन आरोप करतात. कोर्टाचा स्टे असताना घाई गडबड न करता व्यवस्थित सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण मांडण्यात आले असते तर निश्चितच आरक्षण टिकले असते. तसेच गायकवाड समितीचा अहवाल मराठीत होता. तो अनुवाद राज्य सरकारने इंग्लिशमधून करुन दिला असता तर सरकारी वकिलांना तो अहवाल सुप्रीम कोर्टात नीट मांडला आला असता.

हेही वाचा - नांदेड : रोहीपिंपळगावात सामाजिक शांतता कायम राखा- प्रमोदकुमार शेवाळे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस हे चांगले वकील आहेत. त्यांनी मराठा आरक्षण कोर्टात कसे टिकेल यासाठी स्वतः पूर्ण अभ्यास करुनच मुंबई उच्च न्यायालयात मांडला होता तसेच तो हायकोर्टात टिकला होता. त्यावर स्टे आला नव्हता. या राज्य सरकारने एक दोन वकील बदलून चांगले नवीन वकील लावले असते तर हे आरक्षण निश्चितच टिकले असते. मात्र उद्धव ठाकरे हे कुठलाही अभ्यास न करता बोलतात. मुळातच मराठा समाज हा मागास आहे. त्यामुळे नोकरी व शिक्षण यामध्ये आरक्षण मिळण्यास काही हरकत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षातील प्रमुख नेत्यांना मराठा समाजास आरक्षण देण्यास कायम विरोध आहे. निवडणुका तोंडावर आल्या की त्यांना या समाजास आरक्षण देऊ वाटते.आजपर्यंतचे महाराष्ट्रातील जेवढे काही मुख्यमंत्री होऊन गेले त्यात सर्वात अपयशी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आहेत. असा आरोप ही त्यांनी केला.

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा राज्य चालविण्यास ताळमेळ नसल्यामुळे कोरोना महामारी असो की मराठा आरक्षण असो यामध्ये अपयशी ठरले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की मराठा आरक्षणासाठी निवृत्त न्यायाधीश व चांगल्या वकीलाची समिती तयार करण्यात यावी व आमचे जे काही सहकार्य लागेल त्यासाठी भाजपा पक्ष एक दिलाने काम करून सर्वस्वी मदत करण्यास तयार आहे. यामध्ये विनाकारण कोणीही राजकारण करु नये, असे शिवाजीराव जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. यावेळी भाजपचे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष अरविंद खराटे, आकाश बोकन यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com