सोमवारपर्यंत केवळ एकाची उमेदवारी दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

कळंब - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 27 जानेवारीपासून सोमवारपर्यंत (ता. 30) जिल्हा परिषदेच्या तालुक्‍यातील नायगाव गटातून कॉंग्रेसच्या आशाबाई दिगांबर टेकाळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेतृत्वांनी इच्छुकांना उमेदवारी देण्यावरून झुलवत ठेवल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेचा ज्वर वाढलेला दिसून येत नाही. 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा आखाडा पेटलेला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या उमेदवारी अद्यापपर्यंत गुलदस्त्यात ठेवल्या आहेत. 27 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी अमावास्येमुळे अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त इच्छुकांना साधता आला नाही. तर शनिवार, रविवारी इच्छुकांनी निवडणूक कार्यालयाकडे पाठ फिरविली. सोमवारी इच्छुक उमेदवारांची नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होईल, असे निवडणूक विभागाला अपेक्षित होते. मात्र नायगाव गटातून कॉंग्रेसच्या आशाबाई टेकाळे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाले. 

ना गर्दी, ना शक्तिप्रदर्शन 
निवडणुका म्हटले की, इच्छुकांकडून पूर्वी उमेदवारी दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांचा फौजफाटा सोबत असायचा. शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल व्हायचे. यंदाच्या निवडणुकीसाठी मात्र हे वातावरण दिसून येत नाही. शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुकांच्या उमेदवारी फायनल झाल्या नाहीत. त्यामुळे सध्यातरी निवडणूक कार्यालयाकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ज्वर थंडच असल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: Only one candidate filed to Monday