गायक-वादक कलावंतांचा केवळ रियाझच!  

kalavant.jpg
kalavant.jpg

जालना : आठ महिन्यांपासून जाहीर कार्यक्रम नसल्याने वाद्यवृंद व संगीत रजनी कार्यक्रमात कला सादर करणारे शेकडो कलाकार आर्थिक विवंचनेत सापडले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संगीत रजनी, मैफली नसल्यामुळे कलावंतांना केवळ रियाझच करावा लागत आहे. 

गेल्या मार्च महिन्यापासून वाद्यवृंद व संगीत रजनीचे जाहीर कार्यक्रम झालेले नाहीत. कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीमुळे जाहीर कार्यक्रमांवर निर्बंध ठेवण्यात आले आहेत. लॉकडाउन व अनलॉकनंतर अनेक क्षेत्रात व्यवहार सुरु झाले आहेत. विवाह समारंभाना बंधने असल्याने जाहीर कार्यक्रम होत नाहीत. मार्च, एप्रिल व मे महिना म्हटले की,लग्न सराईची धामधूम असते.विवाह,वाढदिवस यासह अनेक कार्यक्रमासाठी संगीत वाद्यवृंद कार्यक्रम हमखास नियोजन करण्यात येते.अशा संगीत रजनी व गीत संगीत कार्यक्रमात तबला,ढोलकी, हार्मोनिअम, ऑक्टोपॅड,गिटार,ध्वनी व्यवस्था पाहणारे अनेक कलाकार समूहाने काम करतात. गायक,गायिका, साऊंड सिस्टीम आणि वाद्यवृंद कलाकार यांचे नियोजन असते. 


एकमेकांच्या साथसंगतीने जाहीर कार्यक्रम करणाऱ्या कलाकारांवर आठ महिन्यांपासून आर्थिक आणीबाणी अनुभवावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक दिवसांपासून जाहीर कार्यक्रम नसल्याने उदरनिर्वाहासाठी अनेक कलाकार मोंढा,औद्योगिक वसाहत आणि भाजी मंडईत भाजी विकावी लागत आहे.अनलॉकनंतर सगळेच व्यवहार सुरळीत झाले परंतु गीत संगीत वाद्यवृंद कार्यक्रम निर्बंध असल्याने कलाकारांवर आर्थिक संकट कोसळले असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. 

आठ महिन्यांपासून कुठलाच संगीतमय कार्यक्रम झालेला नाही.कार्यक्रमात असलेले तबलापटू, ढोलकीवादक, गायक-गायिका आणि साऊंड सिस्टीम काम करणारे त्रस्त झाले आहेत. इतर ठिकाणी काम करून घर चालविणारे आहेत. 
गजानन मापारी संचालक, 'स्वरश्री ' संगीत रजनी,जालना 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com