...तरच नैराश्‍याचे वाढते प्रमाण कमी होईल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

धकाधकीच्या जगात माणूस घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावपळ करत आहे. त्यातून येणाऱ्या ताणतणावांच्या प्रसंगाचा सामना प्रत्येकालाच करावा लागत आहे. अशावेळी मानसिक आरोग्य टिकवून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, तरच नैराश्‍याचे वाढते प्रमाण कमी होईल, असा सूर विविध मान्यवरांच्या मनोगतातून व्यक्त झाला

लातूर : धकाधकीच्या जगात माणूस घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावपळ करत आहे. त्यातून येणाऱ्या ताणतणावांच्या प्रसंगाचा सामना प्रत्येकालाच करावा लागत आहे. अशावेळी मानसिक आरोग्य टिकवून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, तरच नैराश्‍याचे वाढते प्रमाण कमी होईल, असा सूर विविध मान्यवरांच्या मनोगतातून व्यक्त झाला. 

स्वर, अंतरंग आणि अभिजात फिल्म सोसायटीच्या वतीने आयोजित मानसरंग चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरवात झाली ती बाधा या चित्रपटाने. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथणकर दिग्दर्शित हा चित्रपट मानसिक आरोग्य, अंधश्रद्धा या विषयावर आधारित होता.

हर कुत्ते का दिन आता है

पुन्हा मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणीच पाणी

बाधा चित्रपटावर चर्चासत्र

चित्रपटानंतर त्यावर चर्चासत्र घेण्यात आले. यात नांदेड येथील मानसोपचार तज्ज्ञ व लेखक डॉ. नंदकुमार मुलमुले, ठाणे येथील डॉ. दीपक राठोड, लातुरातील प्रा. अनिल जायभाये आणि आयोजक डॉ. मिलिंद पोतदार हे सहभागी झाले होते. श्रद्धा-अंधश्रद्धा, मानसिक, शारीरिक आणि आरोग्य याबाबतचे गैरसमज यावर प्रकाशझोत टाकला. 

खंडणीप्रकरणी या अभिनेत्रीला झाली अटक

अनैसर्गिक शक्तीच्या अस्तित्वाचा पगडा
आज समाज कितीही प्रगत झाला असला तरी, माहिती आणि तंत्रज्ञान अत्याधुनिक झाले असले तरी सुशिक्षित, शहरी, ग्रामीण भागातील समाजमनावर असलेला अनैसर्गिक शक्तीच्या अस्तित्वाचा पगडा काही केल्या कमी झाला नाही. कधी वैयक्तिक, मानसिक कारणांनी, तर कधी विविध समाजघटकांतील हितसंबंध यातून करणी, बाधा याविषयीचे नाट्य अधिक गडद होत जाते. त्यामागील मनोसामाजिक कारणांचा ऊहापोह करण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे, असे सांगतच वक्‍त्यांनी मानसिक आरोग्य टिकवून ठेवणे, मन प्रसन्न राहील असे विचार-कृती करणे गरजेचे आहे, याकडेही लक्ष वेधून घेतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only then will the prevalence of depression decrease