...अरेरे, संत्रा गोळीच्या बहाण्याने बोलावले अन् केला अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

-परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील घटना
-३० नोव्हेंबर रोजी उघडकीस आला प्रकार
-पिडितेला दिली जिवे मारण्याची धमकी
-आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

 

गंगाखेड (जि.परभणी) : दिवाळीनिमित्त तिच्या आजी, आजोबाकडे रहायला आलेल्या एका अल्पवयीन मुलीला आजोबाच्या घरा शेजारी राहणाऱ्या एकाने संत्रा गोळी देतो, असे म्हणत मुलीला बोलावत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार गंगाखेड येथे ता.३० नोव्हेंबर रोजी उघडकीस आला. दरम्यान, याप्रकरणी सोमवारी (ता.दोन) पिडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी नगर येथील कुटूंब कामानिमित्त हैदराबाद (आंध्रप्रदेश) येथे वास्तव्यास आहे. दिवाळीनिमित्त पिडित मुलगी तिची आजी, आजोबा ता.१९ ऑक्टोबर रोजी गंगाखेड तालुक्यातील शिवाजी नगर येथे आले होते. पिडितेची आई हैदराबाद येथे कामाला असून तिला सुट्टी मिळाली नसल्याने दिवाळीसाठी गावाकडे ती येऊ शकली नाही. दरम्यान, पिडितेच्या शेजारी राहणारा साजन धर्मा चव्हाण (वय १७) याने पिडित आठ वर्षीय बालिकेला संत्रा गोळी, चॉकलेट देतो म्हणून घरात बोलावले. तिच्या तोंडाला पट्टी व पाय बांधुन तिच्यावर अत्याचार केला. जाताना चॉकलेट देऊन कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

आईला विश्वाासात घेऊन सांगितला प्रकार
दिवाळी संपल्यावर ता.१५ नोव्हेंबर रोजी पिडित मुलगी, आजोबा, आजी, हैदराबादला गेले. हा अत्याचार ता.१९ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान, घडला. ता.३० नोव्हेंबर रोजी हैद्राबाद येथील घरी गेल्यानंतर पिडित मुलीने सदर घटना आजीस सांगितली. आजीने तिच्या आईला कामाच्या ठिकाणी जाऊन सदरील घटना सांगितली. आईने घरी येऊन आपल्या आठ वर्षीय मुलीला विश्वासात घेऊन विचारले असताना झाला प्रकार पिडितेने आपल्या आईस सांगितला. 

याच्याविरुध्द गुन्हा दाखल
पिडितेच्या आईने गंगाखेड पोलिस ठाण्यात येऊन सदरची तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सोमवारी (ता.दोन) रात्री ११ वाजता नराधम साजन धर्मा चव्हाण (रा.शिवाजी नगर) याच्यावर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oops, the orange pill was called and tortured