परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी, ढालेगाव बंधाऱ्याचा दरवाजा उघडला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची संततधार सुरु असून सोमवारी रात्री सात मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे जमिनीतील पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. गोदावरी, दुधना, पूर्णा या नद्यांचे पात्र भरुन वाहत आहे. त्यामुळे जिल्ह्यात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, पाथरीजवळील गोदावरी नदीवरील ढालेगाव बंधारा 100 टक्के भरल्याने एक दरवाजा उघडण्यात आला आहे.

परभणी- जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची संततधार सुरु असून सोमवारी रात्री सात मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे जमिनीतील पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. गोदावरी, दुधना, पूर्णा या नद्यांचे पात्र भरुन वाहत आहे. त्यामुळे जिल्ह्यात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, पाथरीजवळील गोदावरी नदीवरील ढालेगाव बंधारा 100 टक्के भरल्याने एक दरवाजा उघडण्यात आला आहे.

परभणीत रविवार पासून सलग पाऊस पडत आहे. कधी रिमझिम तर कधी मुसळधार स्वरुपाच्या पावसाने सर्वत्र पाणी-पाणी करुन टाकले आहे. सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडल्यानंतर रात्रभर पावसाची रिपरिप सुरु होती. पूर्णा (71), ताडकळस (84), पिंगळी (65), देउळगाव (80), पाथरी (74), हादगाव (77), पालम (69) अशा सात मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

अन्य मंडळात देखील जोरदार पाऊस झाला आहे. मंगळवारी तिसऱ्या दिवशीही सुर्यदर्शन झाले नसून सर्वत्र पावसाची रिपरिप सुरु आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 39 पैकी 27 मंडळात 100 टक्के पाऊस झाला आहे. तर, 75 टक्याच्या 10 मंडळात पावसाची नोंद आहे.

Web Title: open the door of Dhalegaon Dam due to Heavy raining