उघडा आजीबाईचा बटवा; सर्दी खोकला हटवा

गणेश पांडे
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

परभणी ः सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. या परिस्थितीत बहुतांश लोकांना सर्दी व खोकल्याचा त्रास होत असतो. अश्यावेळी डॉक्टरांकडे जाण्या आधी घरगुती उपाय करून पाहिले तर चांगला आराम पडू शकतो. मात्र, त्यासाठी तुम्हाला आजीबाईचा बटवा उघडावा लागणार हे मात्र निश्चित.
वातावरण बदलले की सगळ्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास उद्धवतो. हिवाळा आणि पावसाळ्यात बहुतांश लोकांना सर्दी-खोकला होतो. सर्दी-खोकल्यासाठी खास घरगुती उपाय.

फुटाणे खा 
खोकला येत असेल आणि छातीत कफ साठला असेल तर मुठभर फुटाणे खायला द्यावेत. हे खाल्ल्यानंतर तासभर पाणी पिऊ नये. हे फुटाणे सगळा कफ शोषून घेतात.
 
कांद्याचं पाणी 
लहान बाळांना सर्दी व खोकला झाला असेल तर एक छोटा कांदा बारीक चिरून घ्यावा. तोच कांदा तीन कप पाण्यात उकळत ठेवा. तो काढा उकळून अर्धा झाल्यावर त्याला पिवळा रंग येईल. त्यात थोडी चवीपुरती साखर घालून तो काढा दिवसातून ३-४ वेळा गरम किंवा कोमट करून बाळाला पाजावा. या काढ्यामुळे छातीत साठलेला कफ उलटी होऊन किंवा जुलाबाद्वारे बाहेर पडतो. छातीतून येणारा आवाज बंद होतो.

दूध आणि हळद 
गरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हळद अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरिअल असते. जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते.

आल्याचा चहा 
सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं छान बारीक करून घ्यावं आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं.
 
लिंबू आणि मध 

दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दूधात मिसळून प्यावे, खूप फायदा होतो. 

तुळशीचा पाल्याचा काढा 
चार तुळशीची पाने, तीन लवंगा, दाेन वेलदोडे, दालचिनीचे छोटे तुकडे,  थोडासा गवती चहा, चार कप पाण्यात उकळा. पाण्याचा रंग बदलला की त्यात साखर घाला आणि हा काढा प्यायला द्या.

किरकाेळ आैषधी घेण्यापेक्षा हे उपाय चांगले
सध्या आैषधी दुकानांवर जाऊन डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अनेक जण किरकाेळ कारणासाठी काेणतेही आैषध मागून घेतात. अशावेळी ही आैषधी घेऊन दुकणे कमी करण्याचा प्रयत्न केला जाताे. पण अनेकदा, नेहमी घेण्यात येणाऱ्या अशा आैषधींमुळे शरिरात साईडईफेक्ट हाेऊ शकतात. त्यामुळे किरकाेळ आैषधी घेण्यापेक्षा हे उपाय केंव्हाही चांगलेच.      

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Open grandma's wallet; Eliminate cold cough