नांदेड पोलिसांचे 'ऑपरेशन ऑल- आऊट'

प्रल्हाद कांबळे
शुक्रवार, 29 जून 2018

नांदेड : शिवाजीनगर ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या गुन्हेगारांनी एक तर जेलमध्ये जाण्यासाठी किंवा हद्द सोडण्याची तयारी ठेवा असा सज्जड दम पोलिस निरीक्षक मच्छींद्र सुरवसे यांनी दिला आहे. त्यांनी गुरूवारी आॅल आऊट आॅपरेशन राबवून अवैध धंद्यावर छापे टाकून पाहिजे असलेल्या गुन्हेगारांना अटक केली.

पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना व उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस ठाण्याचा पदभार घेतलेले नुतन पोलिस निरीक्षक मच्छींद्र सुरवसे यांनी गुरूवारी आपल्या सर्वच अधिकाऱ्यांचे पथक नेमुन कारवाई केली. यात अवैध धंद्यावाल्यांवर कारवाई करून सहा जणांना अटक केली. ज्यात देशी दारु विक्री करणाऱ्यांचा सहभाग आहे. तसेच मटका अड्ड्यावर छापे टाकले. सतीश नवघडे, सूर्यकांत चितेवाड, जगदीपसिंग धुल्लर, शाम कांबळे, बालाजी वाघमारे, राजू पवार यांच्यासह आदींना अटक केली. तसेच पाहिजे असलेल्या आठ आरोपींच्या घरांची झडती घेतली. तसेच २२ आरोपींना समन्स तालीम केले. यासोबतच २५ वहानांवर दंडात्मक कारवाई केली.

हद्दीत चाकु, सुरी, तलवारी घेऊन फिराणाऱ्यांच्या व पोलिस दप्तरी नोंद असलेल्या आरोपींची धरपकड करण्यात येत आहे. हद्दीत जुगार, मटका याशिवाय अवैध धंदे चालु देणार नाही. अनधीकृत होर्डींंग्जवर कारवाई करून सहा होर्डींग्ज जप्त केले. विसावा उद्यानात आक्षेपार्ह वर्तवणुक करणाऱ्या दोघांना अटक केली. या आॅपरेशनमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक करीमखान पठाण, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्र्य काळे, श्रीदेवी पाटील, कमल भोसले यांच्या पथकांनी सहभाग घेतला होता. यामुळे या भागातील गुन्हेगारांसह अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: operation all out by nanded police