बीडमध्ये भररस्त्यात 'सैराट'; बहिणीसमोर मेहुण्याचा खून

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या भावाने तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. बीडच्या गांधीनगर परिसरात ही घटना घडली. सुमित वाघमारे असे या घटनेत मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे.

बीड : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या भावाने तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. बीडच्या गांधीनगर परिसरात ही घटना घडली. सुमित वाघमारे असे या घटनेत मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे.

दोन महिन्यांपूर्वीच सुमितचा वर्गातल्या मुलीसोबत प्रेमविवाह झाला होता. हा विवाह मुलीच्या भावाला पसंत नव्हता. त्यामुळे मुलीच्या भावाने मित्रांच्या साथीने सुमितची धारदार शस्त्राने हत्या केली. मुलीचा भाऊ बालाजी लांडगे हा फरार आहे. प्रेमप्रकरणातून बहिणीसोबत लग्न केल्याने संतापलेल्या भावाने मित्राच्या साहाय्याने मेहुण्याचा बहिणीसमोर चाकूचे वार करून खून केला. ही घटना बुधवारी (ता. 19) सायंकाळी सहा वाजता तेलगाव नाका परिसरात घडली. सुमित शिवाजी वाघमारे (वय 25, रा. तालखेड, ता. माजलगाव, सध्या मुक्काम नागोबा गल्ली, बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.  

अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी तालखेड येथील सुमित वाघमारे हा बीडमध्ये राहत होता. आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयात तो शेवटच्या वर्षात शिकत होता. त्याच्याच वर्गातील भाग्यश्रीसोबत त्याची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान, दीड ते दोन महिन्यापूर्वी सुमित आणि भाग्यश्रीने प्रेमविवाह केला. मात्र, हा विवाह भाग्यश्रीच्या भावाला खटकत होता. त्याच्या मनात सुमितबद्दल राग होता. बुधवारी (ता.20) भाग्यश्री व सुमित दोघेही परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात आले. परीक्षा देऊन सायंकाळी दुचाकीवरून घरी परतत असतानाच महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर कारमधून भाग्यश्रीचा भाऊ व त्याचा मित्र आले. दोघांनी कारमधून उतरत सुमितवर धारधार शस्त्राने वार केले आणि कारमध्ये बसून सुसाट निघून गेले. भाग्यश्री मात्र मोठमोठ्याने ओरडत मदतीची मागणी याचना करत होती. एका रिक्षाचालकाने तात्काळ धाव घेत सुमितला जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्‍टरांनी त्यास मृत घोषित केले.

Web Title: oppose to love marriage youth killed Sairat Style in beed