संभाजी भिडे यांच्या जालन्यातील कार्यक्रमाला विरोध 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 जानेवारी 2019

जालना - विविध विधानांवरून वादग्रस्त ठरलेले शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे रविवारी (ता. 6) जालन्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत तीन मंदिरांचे उद्‌घाटन होणार आहे. त्यांच्या या कार्यक्रमाला पॅंथर्स सेना, संभाजी ब्रिगेड, अन्याय प्रतिकार दल, भारिप-बहुजन महासंघासह आंबेडकरवादी संघटनांनी विरोध केला आहे. 

जिल्ह्यात जातीय दंगली घडू द्यायच्या नसतील, तर संभाजी भिडेंना जालन्यात प्रवेशबंदी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम चंदपाटील यांनी केली आहे. ते म्हणाले, की भाजपचा नगरसेवक असलेल्या प्रभागातील मंदिराच्या उद्‌घाटनासाठी भिडे यांना बोलाविले आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश बजावल्याने असा कार्यक्रम घेता येत नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनानेही त्यांना परवानगी देऊ नये. 

दरम्यान, भिडेंच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी विविध बहुजनवादी संघटनांनी निवेदनाद्वारे पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Web Title: Oppose of Sambhaji Bhide Jalna program