बीड जिल्ह्यात अ‍ॅपवर ऑर्डर-घरबसल्या घ्या किराणा व भाजी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अंबाजोगाई (जि. बीड) - लॉकडाऊनमुळे असलेल्या संचारबंदीत तुम्हाला बाहेर पडता येत नाही. मग आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून ’सीएससी ग्रामीण ईस्टोअर’ हे अ‍ॅप डाऊनलोड करून मिळवा घरपोच किराणा व भाजीपाला असा उपक्रम येथील रोटरी क्लब व तालुक्यातील देवळा येथील ग्रामीण किसान शेतकरी बचत गटाने सुरू केला आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यावश्य वस्तूंची खरेदी करतांना गर्दी होऊ नये, संसर्ग टाळता यावा व नागरिकांना सुरक्षित किराणा व भाजीपाला खरेदी करता यावा यासाठी रोटरी क्लबतर्फे हा मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अ‍ॅपवरून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी घर बसल्या करता येते. या ॲपवर तुम्हाला ज्या वस्तू हव्या आहेत, त्याची ऑर्डर द्या अन् घरपोच सर्व वस्तू मिळवा. 
लॉकडाऊन व संचारबंदीमुळे घराबाहेर पडणे धोकादायक ठरत आहे. अशा स्थितीत संसर्ग टाळण्यासाठी व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरी बसून उपलब्ध व्हावा यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत.

केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्रालय संचलित सीएससी कॉमन सर्व्हिस सेंटर द्वारा तयार केलेल्या अ‍ॅप्सचा वापर करून किराणा साहित्य, भाजीपाला, औषधी, घरपोच उपलब्ध होणार आहे. यासाठी नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून ’सीएससी ग्रामीण ईस्टोअर’ वरून हे अ‍ॅप डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन अशी माहिती प्रकल्प समन्वयक प्रा. संतोष मोहिते, अध्यक्ष सचिन कराड व स्वप्नील परदेशी यांनी केले आहे.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

पॅकिंग करून देणार साहित्य
ॲपव्दारे ग्रामीण किसान शेतकरी गट व देवळा श्रमकरी ग्रुप आलेल्या ऑॅर्डरनुसार नागरिकांना सेवा उपलब्ध करून देणार आहे. रोटरी क्लबने शेतकरी गटाला हे माध्यम सुरू करून दिल्याने, आमचा शेतकरी गट नवीन तंत्रज्ञानानुसार प्रथमच या सुविधा घरपोच उपलब्ध करून देत आहे. या अॅपव्दारे किराणा व फळांच्या ऑर्डर प्राप्त झालेल्या असून त्या संबंधीत ग्राहकांना पुरवल्या जाणार असल्याचे रवींद्र देवरवाडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com